सांगोला प्रतिनिधी
सांगोला तालुक्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्त्यांच्या निधी वाटपातील अनियमीततेच्या निषेधार्थ शेतकरी कामगार पक्षाचे बेमुदत उपोषण बुधवार दिनांक
8/2/2023 रोजी सोलापूर जिल्हा परिषदेसमोर आयोजित केले आसलेचे भाई बाबासाहेब करांडे म्हणाले.
सांगोला तालुक्यातील विविध ग्रामपंचायतीचे 145 कामांचे प्रस्ताव पाठवले आहेत..ते प्रस्ताव मंजूर न करता समाजकल्याण विभाग सोलापूर यांनी दिलेले मुळ प्रस्ताव डावलुन नव्याने गावाची नावे घालून चुकीच्या पद्धतीने प्रस्ताव मागीतले आहेत.चुकीचे प्रस्ताव पाठविण्यासाठी गटविकास अधिकारी पंचायत समिती सांगोला हे ग्रामसेवक व सरपंच यांच्या वरती दबाव आणत आसुन हा मनमानी कारभाराच्या निषेधार्थ जेष्ठ भाई चंद्रकांतदादा देशमुख, पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर जिल्हा परिषदेसमोर बेमुदत उपोषण करण्यात येणार आहे.
स्व आबासाहेब हे आकरा वेळा आमदार असताना त्यांनी विकास कामांमध्ये कधीही राजकारण अथवा दुजा भाव केला नाही..कारण एकदा लोकप्रतिनिधी निवडून आले की ते कोणत्याही एका पक्षाचे नसतात ते संपुर्ण जनतेचे आसतात... त्या संविधानीक पध्दतीने आबासाहेबांनी विकास कामे केली व विकास निधीचे वाटप होत असताना तो निधीमध्ये समानता कशी येईल हे आबासाहेब पहात असत..सध्या मात्र चित्र वेगळे पहावयास मिळत आहे.निधी वाटपामध्ये राजकारण पहावयास मिळत आहे.अधिकारी वर्ग कोणाचे तरी ऐंकुन दबावामध्ये कामकाज करतात असे निदर्शनास येत आहे.
देशाचा राज्याचा पर्यायाने गावचा विकास साधायचा असेल तर सर्व समाज घटकांपर्यंत विकासाची गंगा पोहचली पाहिजे.व ती पोहचवण्याची जबाबदारी सर्व नेते अधिकारी यांची आहे.ती त्यांची संविधानीक जबाबदारी आसताना हा दुजाभाव सरळ सरळ होताना दिसत आहे.आशा या निधीवाटपातील अनियमतीच्या निषेधार्थ सांगोला तालुक्यातील सरपंच ,उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच सभापती, उपसभापती, पंचायत समिती सदस्य,विविध विकास सोसायटीचे चेअरमन व्हा चेअरमन व सदस्य तसेच तालुक्यातील प्रमुख पदाधीकारी उपोषणास बसुन निधीवाटपातील अनियमीतता दुर करुन सांगोला तालुक्यातील अनुसुचीत जाती व नवबौद्ध वस्त्यांच्या विकासाला निधी मिळावा म्हणून शेतकरी कामगार पक्ष व पुरोगामी युवक संघटना बेमुदत उपोषण करणार असलेली माहीत शेतकरी कामगार पक्षाचे राज्याचे नेते भाई बाबासाहेब करांडे यांनी सांगीतल्याची माहीती प्रसिद्धी प्रमुख भाई चंद्रकांत सरतापे यांनी दिली.