भाळवणी प्रतिनीधी
पंढरपूर तालुकयातील भाळवणी येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स येथील विद्यार्थ्यांनी कलाविष्कार-2023 सादर केला. या कलामहोत्सव अंतर्गत वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न झाले.
या कलाविष्कार महोत्सवाचे उद्घाटन विद्यालयाचे प्राचार्य एन. एम. गायकवाड यांच्या शुभहस्ते कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन व रंगमंचाचे पूजन करून करण्यात आले. यावेळी उपप्राचार्य ए. एस. पिसे, पर्यवेक्षक एस. डी. रोकडे, सेवानिवृत्त ग्रंथपाल यादव , सेवानिवृत्त वरिष्ठ लेखनिक थिटे , ग्रामपंचायत सदस्य नितीन शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध कला गुण सादर केले. यामध्ये शेतकरी नृत्य, लोकनृत्य, गौळण, देशभक्तीपर गीते व नृत्य, रिमिक्स नृत्य, भावगीते, भक्ती गीते याचे सादरीकरण केले. तसेच कलाशिक्षक खरात टी एस यांनी कडकलक्ष्मी ह्या गीतावर लोकनृत्य सादर केले. विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांनी रसिकांची मने जिंकून घेतली. या विद्यार्थ्यांना कला विभाग प्रमुख गोंजारी सर, खरात सर या कला शिक्षकांचे व काळे सर, जमदाडे सर, श्रीमती पाटील मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विधाते सर यांनी केले.