महुद प्रतिनिधी
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतिनिमित्त महुद जिल्हापरीषद गटात युवासेना सांगोला व युवासेना समन्वयक शंकर मेटकरी, युवासेना तालुकाप्रमुख सुभाष भोसले व नवलकुमार गाडे यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी म्हणून विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.
त्यामध्ये ढाळेवाडी, वाघमोडेवस्ती, खिलारवाडी, चिकमहुद , मुळेवस्ती, बंडगरवाडी, कटफळ, खरातवाडी अशा एकून ८ जिल्हापरीषद प्रथमिक शाळेत व ऊसतोड कामगार व त्यांच्या मुलांना युवासेना विस्तारक उत्तम आयवळे यांच्या हस्ते खाऊ वाटप करुन शिवसेनाप्रमुखांच्या ८० टक्के समाजकाण व २० टक्के राजकारण ही शिकवणूक जपण्याचा छोटासा प्रयत्न युवासेना सांगोला व पदाधिकारी यांचा आहे .
यावेळी नवलकुमार गाडे, सचिन सुरवसे ,आप्पा मेटकरी, अथर्व केंगार, भूषण बागल, साईराज अवघडे,शुभम आनुसे, माऊली गाडवे,शंकर बेरगळ, आशिष भोसले ,अण्णा गाढवे, सागर कोळी आदी शिवसैनिक व युवासैनिक उपस्थित होते.
.