पंढरपूर प्रतिनिधी संपत लवटे
श्री विठ्ठल इन्स्टिट्यूट ऑफ प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन संचलित, इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर अँड मॅनेजमेंट स्टडीज, कासेगाव पंढरपूर या महाविद्यालयामध्ये बी.एस्सी (ईसीएस) भाग - १ मध्ये शिकत असलेला विद्यार्थी कु.आदित्य बाबर याने विद्यापीठा अंतर्गत घेण्यात आलेल्या १० मीटर रायफल शूटिंग स्पर्धेमध्ये विद्यापीठामध्ये द्वितीय क्रमांक पटकाविला तर याची १० मीटर रायफल शूटिंग स्पर्धेमधील पुढील लेव्हल खेळण्यासाठी राज्यस्तरीय निवड झाली आहे.
ही स्पर्धा उत्तर प्रदेशमधील मेरठ या ठिकाणी १६ फेब्रुवारी २०२३ ते २३ फेब्रुवारी २०२३ या दरम्यान होणार आहे अशी माहिती विभागप्रमुख प्रा. मुकुंद चौगुले यांनी दिली.सदर स्पर्धेमध्ये विजय संपादन केल्याबद्दल महाविद्यालयाच्या कॅम्पसप्रमुख डॉ.जयश्री भोसले यांच्या हस्ते कु.आदित्य बाबर या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी क्रीडा प्रशिक्षक प्रा. अस्मिता घोलप, विभागप्रमुख प्रा. मुकुंद चौगुले उपस्थित होते.
स्पर्धेमध्ये विजय मिळवल्याबद्दल पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.या स्पर्धेमध्ये विजय मिळवल्याबद्दल कॉलेजचे प्राचार्य डॉ.ए.एस.भोईटे ,संस्थापक सचिव डॉ.बी.पी.रोंगे,अध्यक्ष एच.एम.बागल,उपाध्यक्ष बी.डी.रोंगे,खजिनदार दादासाहेब रोंगे यांनी अभिनंदन केले आणि पुढील स्पर्धा खेळण्यासाठी शुभेच्छा दिल्या.