पंढरपूर प्रतिनिधी
कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयातील प्राध्यापकांसाठी दोन दिवशीय "बेसिक्स ऑफ पायथॉन प्रोग्रामिंग" विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. हि कार्यशाळा मोठ्या उत्साहात संपन्न झाली असल्याची माहिती प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे यांनी दिली.
या कार्यशाळेचे उद्घाटन व्याख्यात्या प्रा. प्रार्थना बक्षी, प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, कार्यशाळेचे समन्वयक डॉ. बाळासाहेब गंधारे आदींच्या हस्ते सरस्वती पूजन करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
या कार्यशाळेत अंतर्गत गुणवत्ता हमी सेल व एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय पंढरपूरच्या माध्यमातून दि. ४ व ५ जानेवारी २०२३ रोजी "बेसिक्स ऑफ पायथॉन प्रोग्रामिंग" या विषयावर दोन दिवशीय कार्यशाळा घेण्यात आली. दरम्यान प्रा. प्रार्थना बक्षी यांचे स्वागत प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले.
या कार्यशाळेच्या माध्यमातून व्याख्यात्या प्रा. प्रार्थना बक्षी यांनी पायथॉन विषयाचे मुलभूत ज्ञान आणि कौशल्य विकास याबद्दल सर्व विभागातील प्राध्यापकांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. दिशा व्होनमाने हिने यांनी केले तर आभारप्रदर्शन समन्वयक डॉ. बाळासाहेब गंधारे यांनी मानले.
या कार्यशाळेत प्राध्यापकांनी विचारलेल्या प्रश्नांना व्याख्यात्या प्रा. प्रार्थना बक्षी यांनी उत्तरे दिली. ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी समन्वयक डॉ. बाळासाहेब गंधारे, डॉ. अल्ताफ मुलाणी, डाॅ. श्याम कुलकर्णी, प्रा. जयमाला हिप्परकर, प्रा. दत्तात्रय कोरके, प्रा. अजित करांडे, प्रा. सोनाली गोडसे-कर्चे आदींसह महाविद्यालयातील सर्व व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.