करकंब मधील आपला परिसर स्वच्छ ठेवणाऱ्या कुटुंबांचा व व्यावसायिकांचा होणार सन्मान
दानशूर दाते महावीर गायकवाड(पुणे) यांनी आजोबा कै.कुंडलिक कापसे यांच्या स्मरणार्थ करकंब गावच्या लेकीच्या झाड टीमला पाण्यासाठी दिलेल्या टँकरचा होणार लोकार्पण सोहळा
चाळीस लोकांचा जीव वाचवणारे करकंब गावचे सुपुत्र सुधीर रणे यांचा होणार जागर टीम व लेकीच झाड टीम वतीन सन्मान
करकंब प्रतिनिधी
करकंब येथे स्वच्छता व पर्यावरण या क्षेत्रात गेले वर्षभर काम करणाऱ्या जागर स्वच्छता अभियान टीम व करकंब गावच्या लेकीचं झाड अभियान टीमला एक वर्षं पूर्ण होत आहेत, त्यानिमित्ताने प्रथम वर्षपूर्ती वर्धापनदिन दिनानिमित्ताने शनिवार दिनांक २१जानेवारी सायंकाळी ६:००वा, शाकंभरी गार्डन (नाटकाचा वाडा) सोमवार पेठ येथे पाटोदा येथील २५ वर्ष ज्यांनी सरपंच पद भुषवून पाटोदा गावचा कसा कायापालट केला या विषयावर मार्गदर्शन (व्याख्यान) आयोजित करण्यात आले असून हे अनमोल मार्गदर्शन ऐकण्यासाठी सर्व करकंबकर व पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे.
तसेच याच वेळी करकंब मधील आपल्या घराचा परिसर व दुकानाचा परिसर स्वच्छ ठेवणाऱ्या कुटुंबांचा व व्यावसायिकांचा सन्मान भास्करराव पेरे पाटील व उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे, जेणेकरून करकंब मधील ग्रामस्थांना स्वच्छतेची आवड निर्माण व्हावी आणि आपल करकंब गाव स्वच्छ ठेवण्यासाठी खारीचा वाटा उचलल्याचा आनंद वाटेल,तसेच करकंब गावच्या लेकीचं झाड अभियान टीमला आदरणीय दानशूर दाते श्री विठ्ठल टायर कार्पोरेशन पुणे चे मालक महावीर गायकवाड यांनी आपले आजोबा कै.कुंडलिक कापसे यांचे स्मरणार्थ अतिशय मोठं काम लेकीच्या झाडांच्या पाण्यासाठी ५००० लीटरचा टँकर भेट दिला असून त्या पाण्याच्या टँकरचा लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे.
तसेच करकंब गावच्या सुपूत्राने ४०जणांचा प्रसंगावधान राखून प्राण वाचवला ते सुधीर रणे यांचा सत्कार करण्यात येणार असून या अतिशय सुंदर कार्यक्रमाला सर्व करकंबकर व पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जागर स्वच्छता अभियान टीम व करकंब गावच्या लेकीचं झाड अभियान टीमच्या वतीने करण्यात आले आहे