सोलापूर प्रतिनिधी
केगांव येथील एन.बी. नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर नवले उपप्राचार्य डॉ. रवींद्र व्यवहारे व डॉ.शेखर जगदे ,डॉ. विनोद खरात, प्रा.अझरुद्दीन शेख, प्रा. अनिल कोठमाळे, प्रा. राजकुमार लांडगे, प्रा. मन्सूर अली काझी, प्रा. बालाजी बेदरे, प्रा. सुमेध पाठक,प्रा.सचिन चव्हाण आदी उपस्थित होते.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शंकर नवले यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याविषयी विद्यार्थ्यांना महिती सांगितली. यावेळी या कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.