पंढरपूर प्रतिनिधी
पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य च्या पंढरपुर तालुका उपाध्यक्ष पदी श्रीराम देठे यांची निवड झाल्याबद्दल श्री. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित (आबा) पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी अभिजित पाटील यांनी श्रीराम देठे यांचे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
यावेळी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन. प्रेमलता रोंगे, संचालक साहेबराव नागणे , संचालक धनाजी काळे, युवा नेते सचिन ताटे, जोतीराम देठे व इतर मान्यवर उपस्थित होते.
नूतन उपाध्यक्ष श्रीराम देठे यांना तेज न्यूज परिवार कडून हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी देठे म्हणाले,की तालुक्यातील पत्रकारांच्या विविध प्रकारच्या अडचणी व प्रश्न सोडविण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे.