मंगळवेढा प्रतिनिधी
जिल्हा परिषद सोलापूर संलग्न महिला व बालकल्याण विभाग अंतर्गत मंगळवेढा तालुक्यातील नवीन अंगणवाडी बांधकाम करणेसाठी ६७ लाख ५० हजार रुपये निधी मंजूर झाल्याची माहिती पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. शिक्षण हे सामाजिक क्रांतीचे प्रमुख आणि आवश्यक अस्त्र आहे. बालवयातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या विधायक मूल्यांची आवड व गोडी प्राप्त व्हावी यासाठी महाराष्ट्र शासन विविध योजना आणि उपक्रम यांच्या माध्यमातून निरनिराळ्या बाबी शिक्षण दरबारी राबवत आहे. समाजाच्या शिशु वयोगटातील बालकांना शाळेत प्रवेश घेण्यापूर्वी विविध शैक्षणिक गोष्टी चांगल्या पद्धतीने समजाव्यात यासाठी अंगणवाडी हे बालकांचे संस्कारपीठ समजले जाते. सदर संस्कारपीठाच्या मूलभूत आणि भौतिक गरजांची पूर्तता होण्यासाठी हा निधी मंजूर झाल्याची आ. आवताडे यांनी दिली आहे.
मंगळवेढा तालुक्यातील आंधळगाव(धरणवाडी - ११ लाख २५ हजार), लोणार गावठाण क्रमांक (१) - ११ लाख २५ हजार, महमदाबाद (शे) ( कांबळेवस्ती - ११ लाख २५ हजार), गोणेवाडी(गुंगेवाडी) - ११ लाख २५ हजार, शिरसी गावठाण ११ लाख २५ हजार, मरवडे (अंगणवाडी क्र - १) - ११ लाख २५ हजार असा एकूण ६७ लाख २५ हजार रुपये एवढा निधी मंजूर झाल्याची माहिती आ. आवताडे यांनी दिली आहे. पंढरपूर व मंगळवेढा विधानसभा कार्यक्षेत्रामध्ये रस्ते, आरोग्य, वीज आदी बाबींच्या विकासासाठी आ. आवताडे यांनी शासनदरबारी आपला सातत्यपूर्ण राबता व नियमित ठेवून भरीव निधी मतदारसंघाच्या धोरणात्मक प्रगतीसाठी मार्गी लावला आहे.
राज्याच्या तिजोरीतून निधी उपलब्ध करून मतदारसंघाचा सर्वांगीण कायापालट होत असताना आता बालचमू विद्यार्थ्यांच्या अंगणवाडी बांधकामासाठी सुद्धा आ. आवताडे यांच्या प्रयत्नातून मिनी मंत्रालयातूनही वरील निधी मंजूर झाला आहे. शिशु गटातील बालकांच्या शिक्षण प्रक्रियेमध्ये ऊन, वारा व पाऊस यांचा कोणताही अडथळा निर्माण होऊ नये व विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक इमारतीचा प्राप्त व्हावा यासाठी आसरा आ. आवताडे यांनी उपलब्ध केलेला हा निधी म्हणजे तालुक्यातील शिक्षण संकल्पनेस व्यापक दिशा असल्याचे समाधान मतदारसंघातील शिक्षणप्रेमी आणि नागरिक यांनी व्यक्त केली आहे.
मंगळवेढा तालुक्यातील विविध गावांमध्ये आ. समाधान आवताडे यांच्या विकासाभिमुख कार्यसाधनेतून अंगणवाडी बांधकाम करणेसाठी एवढा मोठा निधी प्राप्त होणे म्हणजे तालुक्यातील शैक्षणिक धोरणांना मोठी संजीवनी आहे. आ. आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली यापुढेही जिल्हा नियोजन समिती व जिल्हा परिषद सोलापूर यांच्या माध्यमातून आणखी निधी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करू - प्रदीप खांडेकर ( नूतन सदस्य, जिल्हा नियोजन समिती सोलापूर)