पंढरपूर प्रतिनिधी
सोलापूर जिल्हा युवक काँग्रेस चे अध्यक्ष, मा श्री सुनंजय दादा पवार,मार्गदर्शक, रुक्मिणी पंढरपूर व नितीन शिंदे युवक काॅगेस जिल्हा उपाध्यक्ष यांच्या वतीने जि. प. शाळा आंबे, आणि परिसरातील वस्तीशाळा,या ठिकाणी मा आ विश्वजीत कदम साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सर्व विद्यार्थ्यांना वह्या आणि खाऊ वाटप करण्यात आले.
यावेळी आंबे गावचे जेष्ठ नागरिक,मा डेप्युटी सरपंच,शाळा सुधार समिती अध्यक्ष श्री विठ्ठल शिंदे यांची उपस्थिती लाभली, तर या कार्यक्रमाचे अध्यक्ष,मा. राजाराम सावंत, मा.संचालक, विठ्ठल सहकारी साखर कारखाना, पंढरपूर यांची निवड करण्यात आली,मा सचिन वाघाटे, संचालक विठ्ठल सहकारी साखर कारखाना, पंढरपूर,यांची उपस्थिती लाभली, डेप्युटी सरपंच, निशाल शिंदे, अरुण शिंदे, श्रीरंग कोळी, मंगेश कोळी, हरिभाऊ शिंदे,नितीन शिरगुर ज्ञानेश्वर कोळी, श्री नितिनजी शिंदे, युवक काँग्रेस सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष या प्रमुख मान्यवरांची उपस्थिती लाभली मा सहकार मंत्री, माननीय पतंगरावजी कदम साहेव यांच्या आठवणी आणि नेतृत्वाविषयी सुंदर माहिती राजाराम आण्णा सावंत यांनी सांगितली.रुक्मिणी परिवाराच्या नेत्या, मा सौ,सुनेत्रा ताई पवार यांचे आभार आंबे गावच्या ग्रामस्थांनी मानले.
सर्व प्रमुख पाहुणे यांच्या शुभहस्ते वह्या आणि खाऊ वाटप करण्यात आले.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका विद्यार्थी यांचे सहकार्य लाभले.