पंढरपूर प्रतिनिधी
पंढरपुरातील हिंदू स्मशान भूमीच्या सुशोभीकरणानंतर आता पंढरपुरातील मुस्लिम समाजाच्या बडा कब्रस्तानातील सुशोभीकरण आणि अंतर्गत रस्ते कॉंक्रिटीकरण करून देण्यास सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे रस्ते कॉंक्रिटीकरण हे मनसे नेते दिलीप धोत्रे हे स्वखर्चातून करत आहे.
पंढरपुरातील खड्डे बुजवण्यासाठी मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी पुढाकार घेत खड्डे तिथे काँक्रिटीकरण टाकून भुजवणे सुरुवात केली. यानंतर पंढरपूरच्या हिंदू स्मशानभूमी मधील संपूर्ण विकास साधत सुशोभीकरण केले. यानंतर आता पंढरपूरच्या मुस्लिम समाजाच्या बडा कब्रस्तान आणि छोटा कब्रस्तान या दोन्ही कब्रस्तानातील अंतर्गत रस्ते हे पूर्णपणे कॉंक्रिटीकरण करून देण्याचा निर्णय घेतला आणि ह्या कॉंक्रिटीकरणाची सुरुवात गुरुवारी करण्यात आली. संत पेठेत असणाऱ्या बडा कब्रस्तान पासून काँक्रिटीकरणाची सुरुवात झाली. हे संपूर्ण काँक्रिटीकरण दिलीप धोत्रे यांच्याकडून स्वखर्चाने करून दिले जाणार आहे. धोत्रे यांच्या कृतीमुळे आता मुस्लिम समाजाच्या कब्रस्तानाचे रूप पालटण्यास सुरुवात होत आहे. मुस्लिम समाजाचा कब्रस्तान हे गेल्या अनेक वर्षापासून दुर्लक्षित होते. या ठिकाणी प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची व्यवस्था करण्यात आली नाही तसेच अंतर्गत रस्ते कॉंक्रिटीकरण व इतर बाबी या ठिकाणी झाल्या नाहीत. या ठिकाणी काळी माती असल्यामुळे पावसाळ्यात पूर्णपणे चिखल होत होता त्यामुळे नागरिकांना यातून चालणे कठीण होत होते . हीच बाब लक्षात घेऊन आता कब्रस्तानाच्या विकासाकरता दिलीप धोत्रे यांनी पाऊल टाकले आहे.
यावेळी नगरपालिकेचे विरोधी पक्षनेते सुधीर धोत्रे, मनसे व्यापारी सेलचे जिल्हाध्यक्ष जयवंत भोसले, नगरसेवक लखन चौगुले, बाळासाहेबांची शिवसेनेचे जिल्हा संघटक संजय बंदपट्टे ,राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव श्रीकांत शिंदे ,मी वडार महाराष्ट्राचे जिल्हाध्यक्ष दत्ता भोसले ,नगरसेवक शिवाजी मस्के, नगरसेवक महंमद उस्ताद, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील, शहराध्यक्ष संतोष कवडे ,उपशहर अध्यक्ष गणेश पिंपळनेरकर ,शिंदे गटाचे शहराध्यक्ष सुमित शिंदे ,वडार महाराष्ट्राचे शहराध्यक्ष पिंटू पवार, समाजसेवकांनाआण्णासाहेब साहेब धोत्रे ,मनसे विभाग अध्यक्ष नागेश इंगोले, शफीक सय्यद ,आदम बागवान ,सलीम सय्यद, जमीर सय्यद, रफीक आतार ,वसीम शेख ,आरिफ शेख ,असिफ शेख ,जमीर तांबोळी इत्यादी उपस्थित होते.