पंढरपूर प्रतिनिधी
१ जानेवारी १९४८ रोजी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पुण्यातील भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली होती. हा दिवस फुले दांम्पत्य सन्मान दिन म्हणून आपण सर्वजण साजरा करत आहोत. मुलींच्या शिक्षणासाठी ही ज्ञानज्योत आज देशाला प्रगतीपथावर नेत आहे. याचअनुशंगाने येत्या १ जानेवारी २०२२ रोजी सकल माळी समाज बांधवांनी व फुले प्रेमीनीं फुले दांपत्याच्या सन्मानासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन माळी महासंघाचे विद्यमान अध्यक्ष अविनाश ठाकरे यांनी सोलापूर मध्ये बोलताना व्यक्त केले.
या बैठकीच्या सुरुवातीस क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी सोलापूर जिल्ह्यातील माळी महासंघाच्या नुतन पदाधिकाऱ्यांना अविनाश ठाकरे यांच्या हस्ते नियुक्त पञ देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात महिला जिल्हाध्यक्षा अनुराधा खारे बोलताना म्हणाल्या, स्ञी शिक्षणाच्या प्रणेत्या
ज्ञनाज्योती सावित्रीबाई फुले यांचे शैक्षणिक क्षेत्रातील कार्याबरोबरच सामाजिक क्षेत्रातील योगदान हे अतुलनीय आहे. संघर्षमय जीवनातून सावित्रीबाई फुले यांनी मुलींच्या शिक्षणाचा पाया रोवला. त्यामुळे आज प्रत्येक क्षेत्रात स्ञिया विविध पदांवर कार्यरत आहे. भविष्यातील शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी तसेच सावित्रीबाई फुले यांचे विचार जिवंत ठेवणेसाठी सामाजिक बांधिलकी म्हणून सर्वच महिलांनी १ जानेवारीच्या फुले दांम्पत्य सन्मान दिन रॅलीत सहभागी व्हावे असे आवाहन सोलापूर जिल्हा अध्यक्षा अनुराधा खारे यांनी केले. या शिवाय उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केली.
या बैठकीस माळी महासंघाचे महासचिव नवनाथ मोहिते, जेष्ठ आघाडी प्रदेश अध्यक्ष शंकर वाघमारे, पश्चिम महाराष्ट्र वैद्यकीय अधिकारी डाॅ. सोमनाथ बोराटे, सोलापूर जिल्हाध्यक्ष रंगनाथ नाळे, आघाडी अध्यक्ष बाबु वडजे, सुनील माळी, जिल्हा महिला अध्यक्षा अनुराधा खारे, उपाध्यक्षा सुशिला नाळे, श्रीकांत हेबळे, विश्वनाथ हेबळे, बश्वराज हुळ्ळी, शामराव भाकरे, वसंत मेहेर, संजय बनसोडे सातव, दिपक म्हेत्रे आदींसह अनेक समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माळी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.