उदय वाघवणकर - पालघर प्रतिनिधी
शिवप्रेरणा महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे अध्यक्ष संजय कदम यांच्या हस्ते किशोर नाना पाटील यांची शिवप्रेरणा महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनच्या पालघर जिल्हा संघटकपदी नियुक्ती करण्यात आली.
त्याप्रसंगी शिवसेना पालघर जिल्हा लोकसभा संघटक जनार्दन पाटील (मामा) तसेच युनियनचे उपाध्यक्ष संजीव राऊत, खजिनदार सूर्यकांत पाटील, चिटणीस समीर राणे आणि पालघर जिल्हा येथील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.