पंढरपूर प्रतिनिधी
गुरुवार, दिनांक ८ डिसेंबर, २०२२ रोजी जिल्हा न्यायालय, पंढरपूर येथील न्यायदालनामध्ये थोर राष्ट्रीय महापुरुषांच्या प्रतिमेचे अनावरण माननीय श्री. एम. बी. लंबे, जिल्हा न्यायाधीश, पंढरपूर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले.
राष्ट्रीय महापुरुषांचे फोटो त्यामध्ये महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरु, छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे प्रमुख न्यायदालनामध्ये माननीय उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्देशानुसार लावण्यात आले आहे.
सदर कार्यक्रमामध्ये थोर राष्ट्रीय महापुरुषांच्या फोटोंना कार्यक्रम अध्यक्ष माननीय श्री. एम. बी. लंबे, जिल्हा न्यायाधीश पंढरपूर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन व उपस्थित न्यायिक अधिकारी, विधीज्ञ, पक्षकार व न्यायालयीन कर्मचारी यांच्या हस्ते फोटोंना पुष्प वाहुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
सदरचा कार्यक्रम हा पंढरपूर येथील जिल्हा न्यायाधीश-१ यांच्या न्यायदालनामध्ये करण्यात आला. सदर थोर राष्ट्रीय महापुरुषांच्या फोटोंचे अनावरण कार्यक्रमादरम्यान न्यायाधीश श्री. एम. आर. जाधव, न्यायाधीश श्री. ए. आर यादव यांनी उपस्थितांना संबोधले. विधीज्ञ संघाकडुन अॅड. सत्यम धुमाळ, अॅड. बादल यादव यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन न्यायाधीश एस. ए. साळुंखे, कार्यक्रमाचे आभार न्यायाधीश एम. आर. कामत यांनी केले.
पंढरपूर अधिवक्ता संघाचे अध्यक्ष भगवानराव मुळे, उपाध्यक्ष एम. एम. नाईकनवरे व सचिव राहुल बोडके उपस्थित होते.
सदर कार्यक्रमास श्री. बी. बी. तोष्णीवाल, तदर्थ जिल्हा न्यायाधीश, श्री. एन. के. मोरे, अति. जिल्हा न्यायाधीश, श्री. एम. आर. जाधव दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर, श्री. एस. एच. इनामदार सह दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर, श्री. ए. ए. खंडाळे दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर, श्री. ए. आर. यादव सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, श्री. एम. आर. कामत ३ रे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, श्रीमती आर. जी. कुंभार ४ थे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, श्रीमती एस. ए. साळुंखे ५ वे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, सरकारी वकील श्री. सारंग वांगीकर, सरकारी वकील श्री. देशमुख, सरकारी वकील श्री. पठाण, श्री. आर. एस. बेंबळकर अधिक्षक, श्री. के. जी. जहागीरदार सहा. अधिक्षक तसेच विधीज्ञ, न्यायालयीन कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.