सोलापूर प्रतिनिधी
अखिल भाविक वारकरी मंडळ यांचे माध्यमातून सोलापूर शहर व जिल्हा युवा समितीचे वतीने दि. 11-12-2022 रोजी सकाळी 10.00 वा. युवा भाविक वारकरी मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
यावेळी खालील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
मा. श्री किरण श्रीचिप्पा
(संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोलापूर )
मा. श्री दर्शन ढगे (संत तुकाराम महाराज पालखी सोलापूर )
मा. श्री माऊली झांबरे
मा. श्री बापू वाडेकर
मा. श्री श्रीकांत डांगे
मा. श्री प्रितम परदेशी
मा. श्री राम कबाडे
या मान्यवरांच्या उपस्थितीत मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
तरुणांमध्ये वारकरी विचार रुजवण्यासाठी, तरुणाई व्यसनमुक्त करणेसाठी , तरुणांची गुणात्मक व संख्यात्मक वाढ करणेसाठी, ऐतिहासिक वारसा, संस्कृती , परंपरा, ई. विषयावर मंथन करणेसाठी , शहर व जिल्ह्यातील तरुण भाविकांचे संघटन करणेसाठी, तसेच सोलापुरातील ज्या युवकांनी विशेष कार्य केले आहे. त्या युवकांचा सत्कार केला जाणार आहे. श्री शिवस्मारक सभागृह, जनता बँक शेजारी, सोलापूर या ठिकाणी हा मेळावा आयोजित केला आहे. ह भ प सुधाकर महाराज इंगळे ( राष्ट्रिय अध्यक्ष), ह भ प जोतिराम चांगभले (प्रदेश अध्यक्ष), संजय तुकाराम केसरे ( जिल्हा अध्यक्ष) , गोविंद विवेक लोंढे ( शहर अध्यक्ष ), भाऊसाहेब तानाजी बेलेराव ( शहर कार्याध्यक्ष), अखिल भाविक वारकरी मंडळ, युवा समिती सोलापूर (शहर व जिल्हा) , ऋषिकेश झांबरे, अनिकेत जांभळे, अंकुश चौधरी , ई. पदाधिकारी मेळावा यशस्वी करणेसाठी परिश्रम घेत आहेत. या मेळाव्याला उपस्थित राहून सहकार्य करावे असे आवाहन एका पत्रका द्वारे करण्यात आले.