सांगोला प्रतिनिधी
दिनांक 26 नोव्हेंबर 2022 रोजी महाविद्यालयामध्ये येथे संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हा दिन साजरा करण्यामागे संविधानाबद्दल जनजागृती करणे हा मुख्य उद्देश होता.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून.प्रा काळेल D.M.( सहयोगी प्राध्यापक कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, पंढरपूर) लाभले तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डॉ. सीमा गायकवाड यांनी भूषवले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना प्रा. काळेल सर यांनी विद्यार्थ्यांना संविधानाबद्दल बहुमोल असे मार्गदर्शन केले. संविधानाचे ऐतिहासिक पार्श्वभूमी, मूलभूत अधिकार व मूलभूत कर्तव्य आणि राज्यधोरणाची मार्गदर्शक तत्वे त्याचबरोबर घटनेचा सरनामा याबद्दल विद्यार्थ्यांना परिपूर्ण माहिती देताना त्यांनी संविधानाविषयी भारतातील नागरिकाने जागृत राहिले पाहिजे त्याचबरोबर त्यांनी संविधान संपूर्ण वाचण्याची अहवान केले आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या डॉ. सीमा गायकवाड यांनी संविधानाच्या माध्यमातून स्त्रियांना कशाप्रकारे अधिकार व हक्क देण्यात आले आहेत व त्या महिला किती प्रमाणात वापरतात हे समजावून सांगून संविधानाचे महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रकल्प अधिकारी डॉ. काकासाहेब घाडगे यांनी केले, प्रस्तावना प्रा. अशोक वाकडे यांनी केली तर मनोगत प्रा. अतुल बाबर यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी प्रा. संभाजी शिंदे सर, प्रा. संतोष भोसले सर, प्रा. लवटे सर, अमोल गाडे सर उपस्थित होते.कार्यक्रम सुव्यवस्था करण्यासाठी बाळू कोळी , विमल माने यांनी मदत केली.