भाळवणी प्रतिनिधी
सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तथा सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कल्याणरावजी काळे यांची महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ लि.मुंबई च्या संचालक पदी बिनविरोध निवड झालेबद्दल संजय मासाळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या समारंभ प्रसंगी केसकरवाडी विकास सेवा सोसायटी संचालक संजय मासाळ,सुरेश बापू देठे,बाळासाहेब मुजावर,पितांबर मासाळ,दत्ता काळे ,बाबा चोरमले,विजयकुमार मासाळ व ग्रामस्थ उपस्थित होते.