पंढरपूर प्रतिनिधी
गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरी तथा श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये प्राध्यापक, विद्यार्थी व पालक यांच्या उपस्थितीत ‘भारतीय संविधान दिन’ साजरा करण्यात आला.
स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली व राष्ट्रीय सेवा योजनेच्या अंतर्गत स्वेरीच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या ओपन थिएटरमध्ये विद्यार्थी व पालकांच्या उपस्थितीत हा ‘संविधान दिन’ साजरा करण्यात आला. प्रारंभी प्रा.यशपाल खेडकर यांनी ‘संविधान दिना’ची माहिती सांगून संविधानाचे महत्व पटवून दिले तसेच उपस्थित पालक व विद्यार्थ्यांना ‘संविधान दिना' निमित्त भारतीय राज्यघटनेची उद्देशिका वाचून दाखवली. त्यानंतर सदर उद्देशिकेचे सर्वांनी सामूहिक वाचन केले. स्वेरीचे संस्थापक सचिव व इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांनी देखील विद्यार्थ्याना ‘संविधान दिना’ निमित्त बहुमोल मार्गदर्शन केले. यावेळी स्वेरी अंतर्गत असलेल्या महाविद्यालयातील विविध विभागात ‘संविधान दिना’चे महत्व पटवून सांगण्यात आले.
यावेळी पालक प्रतिनिधी पांडुरंग ताटे, महिला पालक प्रतिनिधी सौ.उमाताई भोसले, स्वेरीचे युवा विश्वस्त प्रा. सुरज रोंगे, स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज प्रा. एम.एम. पवार, स्वेरी अंतर्गत असलेल्या विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. महेश मठपती, सर्व अधिष्ठाता, सिद्धी बुडुख, आदेश करकंबकर, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, पालक यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.