पंढरपूर प्रतिनिधी संपत लवटे
पंढरपूर येथे लोटस इंग्लिश स्कूल मध्ये रंगल्या तालुका स्तरीय कबड्डी स्पर्धा श्री विठ्ठल इन्स्टिट्यूट ऑफ प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन संचलित लोटस इंग्लिश स्कूल कासेगाव याठिकाणी दिनांक २६ नोव्हेंबर २०२२व २७ नोव्हेंबर २०२२रोजी तालुकास्तरीय क्रीडा आयोजित करण्यात आल्या आज दिनांक २६नोव्हेंबर २०२२रोजी पहिल्या दिवशी कबड्डी स्पर्धेला सुरुवात झाली.यास्पर्धेत एकूण ५४ शाळानी सहभागी झाल्या होत्या वयोगट १४वर्षे १७वर्षे १९वर्ष या वयोगटात एकूण ६४८ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.तसेच या ठिकाणी प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक,व क्रीडा शिक्षक,सहभागी होते.
या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर व शहीद मेजर कुणाल गोसावी यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाले.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री मोहन यादव तालुका क्रीडा मार्गदर्शक अधिकारी पंढरपूर यांच्या हस्ते दीप प्रज्वलंत करण्यात आले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष व लोटस इंग्लिश स्कूलचे अध्यक्ष एच.एम.बागल यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले प्रमुख उपस्थिती संस्थेचे संस्थापक सचिव डॉ.बी.पी.रोंगे.उपाध्यक्ष बी.डी.रोंगे.श्री गजेंद्र पवार, चेतन धनवडे,श्री आबा नवले,श्री गणेश बागल आणि लोटस इंग्लिश स्कूलच्या प्राचार्या डॉ.जयश्री भोसले उपस्थित होत्या.
मान्यवरांचे स्वागत स्कूलच्या प्राचार्या. जयश्री भोसले यांनी केले यावेळेस संस्थेचे विश्वस्त संस्थापक सचिव बी.पी.रोंगे विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करताना म्हणाले बुद्धीचा आणि शरीराचा विकास होण्यासाठी खेळ,व्यायाम, योगासन,खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे मन नेहमी प्रसन्न राहते म्हणून रोज व्यायाम केला पाहिजे किंवा खेळले पाहिजे त्यामुळे विद्यार्थ्यानी खेळ किंवा व्यायाम जोपासणे खूप गरजेचे आहे. तसेच त्यांनी आपल्या माध्यमिक विद्यार्थी आणि विद्यालयीन जीवनातील कबड्डीचे अनुभव सांगितले.
तर तालुका क्रीडा अधिकारी मोहन यादव यांनी आपले मनोगत व्यक्त करताना यशाचा सोपा मंत्र सांगितला तो म्हणजे मी हे करू शकतो आणि मी हे करणारच आत्मविश्वास व विद्यार्थ्यांची खेळाडू वृत्ती विद्यार्थ्यांनी जोपासणे आवश्यक आहे चांगल्या मनात चांगले शरीर वास करू शकते म्हणून विद्यार्थ्यांनी रोज खेळ खेळले पाहिजेत. तसेच आज २६ नोव्हेंबर संविधान दिन या दिनानिमित्त संविधान शपथ देण्यात आली आणि शहीद मेजर कुणाल गोसावी तसेच २६/११च्या हल्ल्यात वीर सैनिक यांना वीर मरण आले त्यांना श्रद्धांजली देण्यात आली.तसेच संस्थेचे संस्थापक सचिव डॉ.बी.पी.रोंगे अध्यक्ष एच.एम.बागल उपाध्यक्ष बी.डी. रोंगे खजिनदार दादासाहेब रोंगे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
या स्पर्धा पार पडण्यासाठी क्रीडा शिक्षिका अस्मिता घोलप, रेखा बंडगर,रुजुता ओव्हाळ,सविता झांबरे, प्रियंका जरे,कोमल इंगळे,शिक्षक सचिन निकम,अमीर इनामदार, ज्ञानेश्वर वायदंडे,दयानंद जाधव, गजेंद्र व्यवहारे, विनायक देवकते, सुशील कुमार शिंदे,युवराज पाटील, उमेश खैरे,आशुतोष दुधाने, शिक्षकेतर कर्मचारी राजकुमार वाघमारे,संजय खपाले, नवनाथ भोसले, विजय फडतरे,परमेश्वर धोत्रे,यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षक संपत लवटे आणि शिक्षिका प्रज्ञा कांबळे यांनी केले.