मुंबई प्रतिनिधी - गणेश हिरवे
हिंदु हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त जोगेश्वरी पूर्वेकडील शाखा क्र ७३ मध्ये युवासेनेचे युवा विभाग अधिकारी अमित पेडणेकर यांनी रविवार दि २० नोव्हेंबर, २०२२ रोजी सकाळी ९ ते दुपारी २ पर्यंत रक्तदान शिबिर आयोजित केले होते.
या शिबिराचे उद्घाटन उपनेते व युवासेना सरचिटणीस अमोल किर्तीकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी माजी नगरसेवक प्रवीण शिंदे, विधानसभा समन्वयक भाई मिर्लेकर, उपविभाग समन्वयक महेश गवाणकर, शाखा संघटक सुचित्रा चव्हाण ज्येष्ठ शिवसैनिक रमेश वारांगे आदी पदाधिकारी आणि रक्तदाते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हे शिबिर चालू असताना स्थानिक आमदार श्री रवींद्र वायकर, आमदार व विभाग प्रमुख सुनील प्रभू, माजी नगरसेवक अनंत नर, विधानसभा संघटक विश्वनाथ सावंत, युवासेनेचे प्रवीण पाटकर, बावा साळवी, चर्मकार सेनेचे तुळशीराम चिपळूणकर, के पाठक, जयवंत लाड , शाखाप्रमुख नंदू ताम्हणकर, सुभाष मांजरेकर, उदय हेगिस्टे, अंकुश मोर्वेकर, मधुकर जुवाटकर, रुपेश कोळंबे, आदित्य घाटगे, रवि भगत, रोमेश चवले, पत्रकार उदय सांगळे आदी पदाधिकारी यांनी शुभेच्छा भेट दिली.या रक्तदान शिबिरात एकूण ७१ बाटल्या रक्त संकलीत करण्यात आले.प्रबोधन रक्तपेढीचे कर्मचारी वृंद या रक्त संकलनासाठी उपस्थित होते.