पंढरपूर प्रतिनिधी
दिवाळीसणा निमित्त बालगोपाल आपल्या घरासमोर किल्ले बनवत असतात. किल्ले बनवण्याच्या आपल्या समृद्ध परंपरेचं जतन व्हावं आणि गड - किल्ल्यांचा आपला ऐतिहासिक ठेवा प्रत्येकाच्या मनामनांत रुजावा या साठी रोटरी क्लब ऑफ पंढरपूर यांचेवतीने किल्ले बांधणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील विजयी स्पर्धेकांना बक्षीस वितरण मान्यवरांच्या केले असल्याची माहिती रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
दिवाळीमध्ये सुंदर दगड मातीने पर्यावरण पुरक आसा किल्ला बनवणाऱ्या मुलांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषीके दिण्यात आले. यामध्ये अँड. सुरेश जोशी यांचे हस्ते प्रथम क्रमांक कुमारी क्षीतीजा पेटकर तर द्वितीय क्रमांकाचे बक्षीस रो. विश्वास आराध्ये यांच्या हस्ते कुमारी पुजा जमदाडे हिला परितोषीक देण्यात आले.
या कार्यक्रमादरम्यान कुमारी क्षीतीजा पेटकर या विद्यार्थिनीने सुंदर आवाजात दमदार पोवाडा सादर करून उपस्थितांची मने जिंकली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पंढरपूर रोटरी क्लबच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.