सोलापूर प्रतिनिधी
दक्षिण सोलापूर विधानसभा मतदार संघातील प्रभाग क्र. १९ मध्ये शिवसेना सदस्य नोंदणी अभियानाची सुरुवात शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांच्या हस्ते व शहरप्रमुख विष्णु कारमपुरी (महाराज) यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली.
सोलापूर शहर व जिल्हा शिवसेना अभियान सुरू असुन त्या अंतरगत दक्षिण सोलापूर विधानसभा मतदार संघातील प्रभाग क्र. १९ मध्ये शिवसेना सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात आले.
प्रारंभी श्री गणेशाचे महाआरती केले. त्यानंतर उपस्थित सर्व मान्यवरांचे सत्कार निलमनगर शाखेच्या वतीने करण्यात आली.
सदर प्रसंगी जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी शिवसेना सदस्य नोंदणी आहवान करतांना म्हणाले की, शिवसेना ही जातपात न बघता केवळ जनसेवा हेच देय धरून आजपर्यंतची वाटचाल केली आहे. म्हणून जास्तीत जास्त शिवसेना सदस्य नोंदणी करण्याचे आहवान केले.
शहरप्रमुख विष्णु कारमपुरी (महाराज) यांनी बोलतांना म्हणाले की, शिवसेना ही एकमेव संघटना आहे की, सर्व सामान्याचा अडीअडचणीला व हाकेला धावून जाणारी संघटना आहे. म्हणून आपण ही शिवसेनेसी बांधीलकी होण्यासाठी सदस्य नोंदणी करा. असे तेलुगु मधून आपले विचार मांडले.
उपजिल्हाप्रमुख अमर पाटील, भिमाशंकर म्हेत्रे, शाखाप्रमुख यादगिरी यांनी यावेळेला आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन राहुल गंधूरे तर आभार प्रदर्शन सचिन गंधूरे यांनी मांडली.
यावेळी शहरप्रमुख विष्णु कारमपुरी (महाराज), कार्यक्रमाचे संयोजक संतोष केंगनाळकर, उपजिल्हाप्रमुख अमर पाटील, दत्तात्रय (पंत) वानकर, प्रताप (भाऊ) चव्हाण, भीमाशंकर म्हेत्रे, संतोष पाटील, तालुका प्रमुख योगीराज पाटील, आनंद बुक्कानुरे, उपशहरप्रमुख सचिन गंधुरे, रवीकांत कांबळे, मोसिन शेख, रेवण बुक्कानुरे, रेवण पुराणिक, सिद्धाराम कोरे, अजय खांडेकर, राजू बिराजदार, रोहित तडवळकर, राहुल गंधुरे, विभागप्रमुख जयराम संचु, सिद्धाराम घोडके, सुनील यादव, किरण येळणे, इरफान शेख, रसूल शेख, श्रीकांत काटकर, गजानन ननवरे, राहुल मोरे, परमेश्वर देवकते, श्रीमंत पात्रे, नवीन कुरापाटी, अमर पाटील, अनिल चींताकींदी, साईराज दिकोंडा, मधुकर चीलवेरी, राज गंधूरे, अमर गड्डम, सिध्देश्वर नगेल्ली, इम्रान पठान, उमेश मंडळ, चंद्रशेखर श्रीनाळ व शिवसैनिक उपस्थितीत होते.