सोलापूर प्रतिनिधी
माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या स्मृती जतन करण्याच्या उद्देशाने 15 ऑक्टोबर हा त्यांचा जन्म दिवस "वाचन प्रेरणा दिन" म्हणून प्रतिवर्षी साजरा करण्यात येतो. जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या वतीने वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून 14 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 11 वाजता व्याख्यानाचा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बहुउद्देशीय सभागृह येथे आयोजित केला आहे.
महाराष्ट्र शासनाचा स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड:मय श्री. ना. पेंडसे पुरस्कारप्राप्त कादंबरीचे लेखक ज्ञानेश्वर जाधवर हे "मानवी जगण्यातील साहित्यिक नोंदी" या विषयावर तसेच सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघाचे संचालक प्राचार्य हरिदास रणदिवे हे "जगण्याची प्रेरणा-वाचन" या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष व ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या हस्ते होणार असून निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती शमा पवार यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न होणार आहे.
सार्वजनिक ग्रंथालयांचे प्रतिनिधी व वाचन प्रेमींनी कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी संतोष जाधव यांनी केले आहे.