सोलापूर प्रतिनिधी
अखिल भाविक वारकरी मंडळ यांचे माध्यमातून कार्यकारीणी बदल करतेवेळी तालुका, जिल्हा, विभाग आणि प्रदेश असे सर्व पदाधिकारी बदलण्यात येत होते. त्यामध्ये प्रदेश अध्यक्षपदी ह भ प जोतिराम चांगभले यांची निवड करताना ह.भ.प. भागवत महाराज चवरे पंढरपूर (राष्ट्रिय उपाध्यक्ष) यांनी सूचना मांडली आणि महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष ह भ प भास्कर भांगे यांनी अनुमोदन देऊन एकमताने निवड करण्यात आली. 2007 साली ह भ प जोतिराम चांगभले यांना सोलापूर शहर अध्यक्ष जबाबदारी देणेत आली. व 2019 साली सोलापूर जिल्हा अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती.
शिवाय त्यांनी महाराष्ट्र राज्य भजन स्पर्धेत दोन वेळा प्रथम क्रमांक पटकावला आहे. भजन, भारूड, कीर्तन , ई. सर्व प्रकारचे वाद्य वादन करतात. सोलापूर शहर व जिल्ह्यातील अनेक मुलांना मृदंग वादनाचे शिक्षण देण्याचे अनमोल कार्य चालू असून तो अनुभव आणि त्यांची काम करण्याची पद्धत पाहून त्यांच्याकडे प्रदेश अध्यक्षपदाची जबाबदारी देणेत आली आहे , असे ह भ प सुधाकर महाराज इंगळे (राष्ट्रिय अध्यक्ष) यांनी निवडी प्रसंगी म्हटले होते.
" मेळविली मांदी वैष्णवांची |"
श्री संत ज्ञानेश्वर महाराजानी 12 व्या शतकामध्ये त्या काळातील सर्व संताना एकत्रित करून वारकरी संप्रदायाच्या वाढीसाठी प्रयत्न केले होते. त्याच वाटेवरून जाण्यासाठी प्रयत्न व्हावा म्हणून वारकरी संप्रदायाचा प्रचार - प्रसार करण्यासाठी आवश्यक अशी कार्यकारीणी करणे गरजेचे आहे. शिवाय सर्वांना एकत्रित करून वारकरी संप्रदायाच्या वाढीसाठी आवश्यक ते सर्व बदल करण्याची कुवत पाहून ही निवड करण्यात आली आहे. या निवडी साठी ह भ प सुधाकर महाराज इंगळे (राष्ट्रिय अध्यक्ष) यांनी गौरवोद्गार काढले व अभिनंदन ही केले. महाराष्ट्रातील अनेक संघटनांनी व भाविकांनी अभिनंदन केले आहे.