पंढरपूर प्रतिनिधी
रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे,स्वैच्छिक रक्तदाते समाजाचे भूषण आहेत असे प्रतिपादन *अ. भा.ग्राहक पंचायतीचे जिल्हा संघटक दीपक इरकल यांनी केले*. ते अखिल भारतीय ग्राहक पंचायत व पंढरपूर ब्लड सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्वैच्छिक रक्तदाता दिन व जेष्ठ नागरिक दिन साजरा करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा अध्यक्ष शशिकांत हरिदास होते.
प्रारंभी अ. भा.ग्राहक पंचायतीचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य संतोष उपाध्ये यांनी प्रास्ताविक केले.याप्रसंगी पंढरपुरातील शतकवीर रक्तदाते शशिकांत दुनाखे, रविंद्र भिंगे यांचा तसेच नियमित रक्तदान करणारे सुहास शिर्के, सोमनाथ होरणे, विजय शिंदे ,विनोद कदम , विनय उपाध्ये, विश्वंभर पाटील, चंद्रकांत देसाई,गोपाळ कुलकर्णी,भजनदास लेंगरे, महेश भोसले यांचा सन्मान करण्यात आला.
श्रेष्ठ नागरिक दिनाबद्दल ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार देशपांडे व डॉ संभाजीराव पाचकवडे यांचा सन्मान करण्यात आला.
डॉ.पाचकवडे यांनी पंढरपूर ब्लड सेंटरने कोविड काळात पश्चिम महाराष्ट्रात केलेल्या कामाबद्दल शासनाने विशेष गौरव ,बहुमान केला असल्याचे सांगितले.
अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे जिल्हाध्यक्ष शशिकांत हरिदास रक्तदात्यांचा गौरव करुन ते समाजासाठी स्वेच्छेने करीत असलेल्या सेवेबद्दल धन्यवाद देवुन इतर रक्तदात्यांनी शतकवीर व्हावे असे आवाहन केले. पंढरपूर ब्लड सेंटरचे संचालक डॉ.संभाजीराव पाचकवडे, प्राजक्ता खाडिलकर, सौ ज्योती उपाध्ये,अ.भा.ग्राहक पंचायतीचे सदस्य मकरंद पदमवार उपस्थित होते.
तालुका अध्यक्ष विनय उपाध्ये यांनी आभार मानले.हा समारंभ यशस्वी करण्यासाठी अश्विनी जाधव, महेश हाके यांनी विशेष परिश्रम घेतले.