पंढरपूर प्रतिनिधी
हिंदवी स्वराज्याचे महामेरू, महाराष्ट्राच्या मातीशी नाळ जोडलेल्या प्रत्येक मराठी मनाची अस्मिता असलेल्या, क्षत्रियकुलावतंस छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्वलंत चरित्राचे अद्भुत दर्शन... प्रेरणादायी चित्रपट 'शिवप्रताप गरुडझेप' विद्यार्थ्यांसाठी ५० रुपये सवलतीच्या दरात पाहता येणार आहे.तरी विद्यार्थ्यांनी या संधीचा फायदा घ्यावा अशी माहिती चेअरमन अभिजित पाटील यांनी सांगितले आहे.
डीव्हीपी मल्टीप्लेक्स मध्ये विद्यार्थ्यांना आपल्या तेजोमय इतिहासाबाबत माहिती असावी या हेतूने सवलतीच्या दरात चित्रपट दाखवण्यात येत आहे. आजचा युवा वर्ग आपल्या राष्ट्राचे भविष्य आहे. त्यांच्या मनात क्रांतीची, तेजोमय संघर्षाची व जिद्दीने कार्य सिद्धीस नेण्याची प्रेरणा निर्माण करणे आपले कर्तव्य आहे.
शिवरायांच्या स्मृतींना स्मरून व देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी कटिबध्द होऊन या कार्यात सहभागी होऊया.. सर्व पालकांनी आपल्या पाल्यांना चित्रपट दाखवावा ही आग्रही विनंती करण्यात आली आहे.