सोलापूर प्रतिनिधी
शेळगी येथील काशिनाथ रोडगीकर गुरूजी लिखित 'अखेरचा हा तुम्हा दंडवत'या काव्यसंग्रहाचे प्रकाशन काशी पीठाचे नूतन जगद्गुरुं श्री श्री श्री १००८ मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांच्या अमृतहस्ते करण्यात आले.
होटगी बृहन्मठात दिवाळी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर रोडगीकर गुरूजी लिखित 'अखेरचा हा तुम्हा दंडवत' या काव्यसंग्रहाचे प्रकाशन जगद्गुरु डाॅ. मल्लिकार्जून विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांच्या शुभहस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी अशोक खानापुरे, शिवलिंग शहाबादे.होटगी संस्थेचे सचिव शांतय्या स्वामी, मुख्याध्यापकद्वय राजकुमार भोरे,संगप्पा म्हमाणे आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी रोडगीकर गुरूजींची प्रकृती बरी नसल्याने उपस्थित राहू शकले नाही म्हणून जगद्गुरुंनी शाल व प्रसाद देऊन आशिर्वाद दिले.गुरूजींच्या प्रकृती विषयी आस्थेने चौकशी केले .गुरूजींचे यापूर्वी २३ काव्यसंग्रह व दोन कथासंग्रह प्रकाशित झाले आहेत.