नेर्ले प्रतिनिधी
नेर्ले येथे कर्तव्य गणेश व नवरात्र उत्सव खारीविहीर चौक मंडळाच्या वतीने रविवारी दिनांक 2 ऑक्टोंबर रोजी नवदुर्गा प्रतिमा पूजन व हळदीकुंकू समारंभ संपन्न झाला यावेळी मंडळाच्या मंडपामध्ये नवदुर्गा प्रतिमा बसूवुन दर्शनासाठी तयार करण्यात आल्या होत्या व रात्री सात वाजता दुर्गा मातेची आरती झाल्यानंतर हळदी कुंकू समारंभ पार पडला
मंडळाच्या मंडपामध्ये महिलां कार्यकर्त्या व मुलींनी रांगोळी व फुलांची सजावट व नवदुर्गा मूर्तीची सजावट करण्यात आली होती दर्शनासाठी येणाऱ्या महिलांना हळदीकुंकू व दुर्गा मातेचा प्रसाद वाटप करण्यात आला
या मंडळाचे प्रत्येक वर्षी नाविन्यपूर्ण कार्यक्रम आयोजित केले जातात यामध्ये महिला मेळावा दुष्काळासाठी मदत अंगणवाडी सेविकांचा सत्कार रांगोळी स्पर्धा लहान मुलांच्यासाठी स्पर्धा आयोजन केले जाते
या कार्यक्रमाचे आयोजन सौ वर्षा पाटील सौ निर्मला पाटील सौ सविता पाटील सौ उज्वला पाटील सौ सुनिता पाटील सौ वर्षा पाटील , कुमारी पूनम पाटील प्रतीक्षा पाटील तनुजा पाटील प्रतिमा पाटील वैशाली वंजारी अंकिता पाटील या महिला व मुलींनी नवदुर्गा प्रतिमेची सजावट व रांगोळी काढण्यात आली होती तसेच मंडळाचे इतर महिला कार्यकर्त्या व कार्यकर्ते यांचे मोलाचे सहकार्य लाभले नवदुर्गा बघण्यासाठी महिलांनी मंडळाच्या मंडपामध्ये गर्दी दिसून आली महिलांनी केलेले नियोजन पाहून महिलांचे व मंडळातील कार्यकर्त्यांचे कौतुक केले जात आहे