पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
सांगोला अर्बन बँकेस पंढरपूरच्या नगराध्यक्षा डॉ.सौ.प्रणिताताई भगीरथ भालके यांची सदिच्छा भेट दिली.
पंढरपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा डॉ. प्रणिताताई भगीरथ भालके यांनी सांगोला अर्बन बँकेस सदिच्छा भेट दिली.यावेळी सतीशभाऊ सावंत उपस्थित होते.यावेळी बँकेच्या पदाधिकारी व अधिकाऱ्यांशी संवाद साधत बँकेच्या विविध उपक्रमांची माहिती घेतली. तसेच आर्थिक क्षेत्रातील सहकार्य, नागरिकांना दर्जेदार बँकिंग सेवा आणि विकासाभिमुख उपक्रमांबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली.
नगराध्यक्षा डॉ. प्रणिताताई भालके यांनी बँकेच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त करत भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

