विजया दशमी निमित्त किराणा किट वाटप
मुंबई प्रतिनिधी - गणेश हिरवे
जोगेश्वरी पूर्व गंगुबाई चाळ कमिटी जय संतोषी माता मित्र मंडळाचे नवरात्रोत्सव साजरे करण्याचे यंदा रौप्य महोत्सवी वर्ष होते व त्यानिमित्ताने मंडळाच्या वतीने सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
त्यात मंडळाने स्वतः आणि समाजातील काही दानशूर व्यक्तींनी पुढाकार घेऊन गीतांजली रेल्वे कॉलनी जोगेश्वरी पूर्व येथील वंचित मुलं ज्यांची शाळा अनेक वर्ष डोअर स्टेप स्कूल मार्फत बस मध्येच भरत आहे अशा ५० विद्यार्थ्याना किराणा किट देऊन सहकार्य करण्यात आले.
यावेळी मंडळाचे धडाडीचे कार्यकर्ते विजय शानभाग, हेमंत मोर्वेकर, विलास जावकर, रवींद्र बिरमुळे, अशोक काळे, शरद जी, निखिल जी, गौरेश शानभाग आदी मान्यवरांनी वेळातवेळ काढून किट वाटप केले.ज्यांनी ज्यांनी या उपक्रमासाठी मदत केली अशा सर्वांचेच आभार मानण्यात आले.