सर्व माता भगीनींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला
नवरात्री उत्सव निमित्ताने सनराईज पब्लिक स्कूल शेळवे येथे सनराईज होम मिनिस्टर खेळ पैठणीचा हा उपक्रम उत्साहात पार पडला, सकाळच्या सत्रात प्रशालेतील मुलींनी गरबा अन दांडिया खेळून कार्यक्रमात रंगत आणली, दुपारच्या सत्रात होम मिनिस्टर च्या मुख्य खेळास सुरुवात झाली, पालकांमधून जवळपास १०५ महिलांनी सहभाग नोंदवला त्यामध्ये तळ्यात-मळ्यात, लिंबू-चमचा, सुई- दोरा प्लास्टिक ग्लास चा बंगला बनवणे व संगीत खुर्ची ई.मजेशीर इव्हेंट घेण्यात आले,अंतिम फेरी नंतर प्रश्नोत्तरे व जोडीदाराच्या आवडीनिवडी या प्रश्नांच्या आधारे शेवटचे चार विजेते निवडण्यात आले.
शेवटच्या क्षणाला सणराईज पैठणीच्या मानकरी ठरल्या त्या खेडभाळवणी येथील सौ.नयना शहाजी पाटील तर सोन्याची नथ पटकावली ती आजोती येथील सौ.मोहिनी अनिल शिंदे यांनी, तिसऱ्या व मेकअप बॉक्स च्या मानकरी ठरल्या त्या सौ. वनिता केशव कौलगे, व चौथे पारितोषिक (पर्स) सौ.आरती प्रमोद गाजरे यांनी पटकावले, पहायला आलेल्या २० महिला भगिनींसाठी लकी ड्रॉ पद्धतीने विजेत्यांची घोषणा करण्यात आली.
त्यामध्ये प्रथम पारितोषिक नेकलेस सेट च्या मानकरी ठरल्या पंढरपूर येथील कु.सोनाली शिवाजी होटे तर द्वितीय क्रमांकाचे बँगल्स सेट चे पारितोषिक सौ. सुनिता धनाजी होटे यांनी पटकावले सर्व सहभागी माता पालकांना प्रशालेच्या वतीने आकर्षक गिफ्ट देण्यात आले..!
सणराईज मीडिया व ऍडव्हरटायजिंग कंपनीचे सर्वेसर्वा समाधान तानाजी गाजरे यांनी पहिले बक्षीस पैठणी साडी स्पॉन्सर केली, त्याबद्दल सनराईज परिवाराकडून त्यांचे आभार मानण्यात आले;
संपूर्ण कार्यक्रमाचे संचालन महाराष्ट्र माझा चे संपादक व सुप्रसिद्ध व्याखानकार अविनाश सुर्वे उर्फ अविनाश भाऊजी यांनी अतिशय मनोरंजक पद्धतीने केले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशालेच्या संपूर्ण स्टाफ ने खूप मेहनत घेतली...!!
सर्व विजयी स्पर्धकांचे व वेळात वेळ काढून उपस्थित माता भगिनी,पालक परिवार यांचे आभार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष समाधान गाजरे संस्थापक सचिव अंकुश गाजरे व संस्थापक उपाध्यक्ष अजित लोकरे यांनी मानले...!!
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहन गायकवाड यांनी केले तर गुणलेखन सौ.दिपाली कुंभार, सौ.चंदारानी व सोनाली गायकवाड तर व्यवस्थापन सौ.उषा लामकाने,मनिषा गोरे,प्रियांका गाजरे,अन्नू शेख,आरती सुरवसे,सुफिया नदाफ,शितल पवार यांनी केले...
शेवटी अल्पोपहाराची सोय करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली...!!