बदलापूर प्रतिनिधी
कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या कंत्राटी सफ़ाई कर्मचाऱ्यांच्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी, त्यांच्या न्याय हक्कांसाठी आज मुख्याधिकारी योगेश गोडसे यांनी खाजगी कंत्राटदार आणि मनसे कामगार कर्मचारी सेनेचे पदाधिकारी यांची त्यावेळी उमेश तावडे, कार्याध्यक्ष, निशांत मांडविकर चिटणीस उपस्थित होते.
सदर बैठकीत मुख्याधिकारी योगेश गोडसे यांनी कंत्राटी सफ़ाई कर्मचाऱ्यांना पूर्ण पगार देण्याचे तसेच सर्व सुविधा त्यांना मिळाव्यात असे आदेश खाजागी कंत्राटदारांना दिले. कंत्राटी सफ़ाई कर्मचाऱ्यांनी पेढे वाटप करुन आनंद साजरा केला. राजेश उज्जैनकर उपाध्यक्ष - मनसे कामगार सेना यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक पार पडली. अशी माहिती बदलापूर युनिट कामगार कर्मचारी सेना महाराष्ट्र नवनिर्माण महापालिका अध्यक्ष संगीता चेंदवणकर यांनी तेज न्यूजला दिली.