भाळवणी प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील माळावरील श्री भवानी देवीची यात्रा कोजागिरी पौर्णिमेस मोठ्या प्रमाणात भरली होती या यात्रेस भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
गेली पंधरा दिवस येतील मंदिरात अनेक छोट्या मोठ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी देवीची सकाळ संध्याकाळ आरती केली जात होती यात्रेच्या मुख्य दिवशी छबिणाची मिरवणूक काढण्यात आली होती. रविवारी व सोमवारी करण्यात आले होते.
सदरची यात्रा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व मानकरी, पुजारी, कमांडोपथक, पोलीस प्रशासन, ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी, ग्रामस्थ यांनी सहकार्य केल्यामुळे मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी सरपंच राजकुमार पाटील, उपसरपंच सविता लोखंडे,शिवसेना पंढरपूर विभाग जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे, ग्रामपंचायत सदस्य नितीन शिंदे, पोपट इंगोले,रणजीत जाधव,मुसा शेख,काका म्हेत्रे,जयवंत शिदे,दिपक गवळी,धोंडिराम शिंदे,गणपत गवळी,विजय शिंदे, प्रवीण शिंदे, तानाजी पाटील,बाळू माने,देविदास जमदाडे,हणमंत जमदाडे,शिवदास जमदाडे,संजय जमदाडे,रामचंद्र सावंत,अर्जुन गवळी,गोरख लिंगे,पांडुरंग सावंत,हणमंत लिंगे, विष्णूपंत लिंगे,बापू बुरांडे,कुंडलिक शिंदे, बाळासाहेब कापसे,नीलकंठ गवळी,पांडुरंग म्हेत्रे, माऊली सावंत,परशुराम सावंत,संजय लिंगे,राहुल शिंदे,कल्याण गवळी,हर्षद गवळी, सराटे सर्व मानकरी पुजारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी देवीच्या आरतीने यात्रेची सांगता करण्यात आली.