चिंचणी प्रतिनिधी
खरं तर चिंचणी सारख्या छोट्या गावामध्ये गेल्या 42 वर्षांमध्ये कोणत्याही प्रकारचा गुन्हा घडून त्याची पोलीस दप्तरी नोंद झालेली नाही. त्यामुळे चिंचणीचा क्राईम शून्य असावा त्यामुळे पोलीस प्रशासनातल्या दप्तरामध्ये चिंचणीकरांची ओळख सुद्धा शून्यच परंतु या गावनं वेगळ्या पद्धतीने उभं केलेलं काम मग त्यामध्ये स्वच्छ सुंदर गाव, पर्यावरण, वृक्ष लागवड , ध्वनी आणि धुरा चे प्रदूषण (फटाके न वाजवणे )कृषी ग्रामीण पर्यटन ,अशा वेगवेगळ्या अर्थाने हे गाव आता आपली वेगळी ओळख निर्माण करत असताना या गावाला पोलीस प्रशासनातील अनेक मुख्यअधिकारी यांनी भेटी दिलेल्या आहेत. यामध्ये फक्त भेटीच दिल्या असे नाही तर त्यांनी या गावासाठी व्यक्तिगत खिशातून मदत करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
पुणे ग्रामीण चे डी.सी.पी. मितेश घट्टे यांनी जि. प .शाळा चिंचणी या शाळेला संगणक संच भेट दिला.आणि गावाविषयी भरभरून लेख सुद्धा लिहिला. सोलापूर जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी सोनचाफ्याचं झाड लावून वृक्ष लागवडीत सहभाग नोंदवला.पंढरपूर ग्रामीणचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांनी अलिबागला बदली झाल्यानंतर सुद्धा पूर्वीचा ऋणानुबंध कायम राहवा म्हणून चिंचणी ला सहकुटूंब भेट दिली पर्यटन केंद्रात जेवल्यानंतर जेवणाचे पैसे दिले आणि वरून या कृषी ग्रामीण पर्यटनासाठी पाच हजार रुपयाची मदत केली .याच्या अगोदर दत्ता शिंदे पोलीस प्रमुख पालघर यांनी सुद्धा वृक्ष लागवडीमध्ये सहभाग नोंदवला होता.पंढरपुरचे डी.वाय.एस.पी. विक्रम कदम,पी.आय. धनंजय जाधव यांनी जागतिक पर्यटन दिनानिमित्त 'गप्पागोष्टी' या कार्यक्रमात सहभाग नोंदवला.अशा अनेक सन्माननीय अधिकारी यांनी भेटी दिलेल्या आहेत.
गाव फक्त अति संवेदनशील असून चालत नाही तर 'विकास कामांमध्ये' सुद्धा 'संवेदनशील'असेल तर अनेक अधिकारी भेट आणि मदत सुद्धा करू शकतात हा चिंचणीकरांचा अनुभव आहे .
साभार मोहन अनपट साहेब