सोलापूर प्रतिनिधी
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ उद्यम नवउपक्रम फाउंडेशन आणि भूशास्त्र संकुलन तथा इन्क्यूबेशन सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरणाच्या संकल्पनेवरती आधारित स्टार्टअप कल्पनेसंदर्भात एंवरथॉन 1.0 स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेसाठी भारतातून एकूण 88 स्पर्धक या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. या स्पर्धेचे पारितोषिक वितरण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील सभागृहात करण्यात आले असून यावेळी विजेत्या स्पर्धकांना सोलापूर महापालिका आयुक्त पी शिवशंकर आणि सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉक्टर मृणालिनी फडणवीस यांनी पारितोषिके दिली.
या स्पर्धेमध्ये सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातून स्थापत्य अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेल्या कु ऋतुजा बाबर, कु स्नेहा भोसले, कु सायली उबाळे आणि वैष्णवी बिराजदार यांना त्यांच्या 'युज ऑफ कार्बन पोल्युटंट इन बिल्डींग टाइल' या संकल्पनेसाठी त्यांचा गौरव करण्यात आला. या संकल्पनेसाठी सिंहगड महाविद्यालयातील सिव्हिल विभागातील प्रा.सतीश आवारे यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळाले.
या यशाबद्दल सिंहगड संस्थेचे सहसचिव संजय नवले, प्राचार्य डॉ.शंकर नवले, उपप्राचार्य डॉ. रवींद्र व्यवहारे व डॉ.शेखर जगदे, सिव्हिल विभागप्रमुख डॉ. प्रदीप तपकीरे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मच्याऱ्यांना अभिनंदन केले.