पंढरपूर प्रतिनिधी
श्री विठ्ठल सह. साखर कारखान्याचा ४१ वा गळीत हंगाम शुभारंभ दिनांक १६.१०.२००२ रोजी सकाळी • ११.०० वाजता या शुभमुहूर्तावर मा. विरोधी पक्ष नेते आमदार प्रविण दरेकर, आमदार शहाजीबापू पाटील, शेखर गायकवाड साखर आयुक्त, पुणे आदी मान्यवरांच्या शुभहस्ते व कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. तसेच कलश पूजन कारखान्याचे संचालक दत्तात्रय विश्वनाथ नरसाळे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
सदर प्रसंगी आमदार प्रविण दरेकर यांनी आपले भाषणात बोलताना म्हणाले की, सहकारी साखर कारखान्याचे सभासद हे मालक आहेत. हा कारखाना वाचविणेसाठी चेअरमन श्री अभिजीत पाटील यांना मुंबई जिल्हा मध्य. सह. बँकेकडून आर्थिक मदत केली. एखादा कार्यकर्ता जेव्हा चांगले काम करतो तेंव्हा तो कोणत्याही पक्षाचा असला, तरी त्याच्या पाठीमागे सर्वांनी उभा राहिले पाहिजे. शेतकऱ्यांना एफ. आर. पी.साठी आंदोलने करूनही एफ.आर.पी. रक्कम कारखान्याकडून मिळत नाही, त्यासाठी श्री शेखर गायकवाड साहेब यांच्या सारखे सक्षम अधिकारी असतील तरच शेतकऱ्यांना वेळेत एफ.आर.पी. मिळेल अभिजीत पाटील यांना कारखान्यासाठी सर्वतोपरी मदत करणार असल्याचे सांगितले. हा कारखाना गत सिझन बंद अवस्थेत असून देखील ३ महिन्यात कारखाना चालू करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम केलेबद्दल चेअरमन श्री अभिजीत पाटील यांचे कौतुक केले.
स्वागत व प्रास्ताविक कारखान्याचे संचालक श्री तुकाराम मस्के सर यांनी केले, तर कारखान्याचे प्र. कार्यकारी संचालक डी. आर. गायकवाड यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.
या कार्यक्रमासाठी कारखान्याचे व्हाईस चेअरमन सौ. प्रेमलता रोंगे, संचालक सर्वश्री संभाजी भोसले, कालिदास पाटील, दिनकर चव्हाण, सुरेश भुसे, बाळासाहेब हाके, धनंजय काळे, साहेबराव नागणे, कालिदास साळुंखे, सचिन वाघाटे, जनक भोसले, प्रविण कोळेकर, नवनाथ नाईकनवरे, सिताराम गवळी, अशोक जाधव, सिध्देश्वर बंडगर, समाधान काळे, श्रीमती कलावती महादेव खटके, सौ सविता विठ्ठल रणदिवे, तज्ञ संचालक सर्वश्री दशरथ जाधव, अशोक तोंडले, तसेच एम.एस.सी. बँक प्रतिनिधी सी. एस. पाटील, धाराशिव साखर कारखान्याचे एम. डी. श्री अमर पाटील, मुंबई बँकेचे संचालक श्री विठ्ठलराव भोसले, साखर उपआयुक्त श्री संजयकुमार भोसले तसेच दामाजी कारखान्याचे माजी चेअरमन व सिताराम कारखान्याचे चेअरमन श्री शिवाजीराव काळुंगे सर व राजाराम सावंत, कारखान्याचे माजी संचालक, पंढरपूर व मंगळवेढा नगरपालिकेचे आजी-माजी नगरसेवक तसेच जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सदस्य, सर्व अधिकारी व कर्मचारी वर्ग, कार्यकर्ते, सभासद, व्यापारी व हितचिंतक उपस्थिती होते.