सोलापूर प्रतिनिधी
प्रशालेत " वळसंग केंद्र "अंतर्गत "शिक्षण परिषद "संपन्न झाली. प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी DIET चे अधिव्याख्याता नदाफ . विस्तार अधिकारी नागनसुरे,वळसंग केंद्राचे केंद्र प्रमुख देविदास वाघमोडे, माशाळे तसेच इतर शाळांचे मुख्याध्यापक आणि शिक्षक, शिक्षिका उपस्थित होते. प्रतिमा पूजन श्री नागनसुरे सर यांच्या हस्ते झाले त्यानंतर प्रशाळेतील इयत्ता 10 वी च्या विद्यार्थिनींनी स्वागत गीत सादर करत मान्यवरांचे स्वागत केले.
त्यानंतर प्रशालेचे मुख्याध्यापक अतनुरे यानी मान्यवरांचा स्वागत सत्कार "शाल -पुष्प गुच्छ "देऊन केले. प्रस्तावना भाषणात अतनुरे यांनी शिक्षण परिषद त्यात मिळणारे ज्ञान, माहिती याबद्दल मनोगत व्यक्त केले.
तदनंतर झालेल्या प्रशिक्षणात मार्गदर्शकांनी "निपुण भारताची संकल्पना, मूल्यमापन, दशसूत्री, Inspire Award, वाक्य-संख्या ज्ञान, NEP चे धोरण, SDG संकल्पना, ज्ञानरचनावाद या व इतर अनेक संकल्पना स्पष्ट केल्या.
यावेळी नागनसुरे, नदाफ यांनी नवनवीन माहिती देत मार्गदर्शन केले. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेचे सहशिक्षक बिराजदार एन टी यांनी अतिशय समर्पक रित्या केले तर संपूर्ण "शिक्षण परिषद "यशस्वी रित्या पूर्ण होण्यासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक अतनुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षकांनी कर्तव्य पार पाडले.