सोलापूर प्रतिनिधी
श्री ज रे प्रशालेत मोफत सायकल वाटप कार्यक्रम मोठ्या थाटात पार* पडला.जि. प. शाळा लिंबी चिंचोळीचे शिक्षिका पोरे यांनी "सासऱ्यांच्या स्मरणार्थ " गरीब व गरजू विद्यार्थिनीना श्री ज रे प्रशाला लिंबी चिंचोळी व जि. प. प्राथमिक शाळा लिंबी चिंचोळी विद्यार्थिनींसाठी पाच सायकल भेट "देऊन गरजू विद्यार्थिनींना मदत केले.
या कार्यक्रमाचे* अध्यक्षस्थानी , DIET चे अधिव्याख्याता नदाफ ,विस्तार अधिकारी नागनसुरे , वळसंग केंद्राचे केंद्र प्रमुख वाघमोडे ,वळसग केंद्रातील सर्व मुख्याध्यापक श्री ज. रे .प्रशाला व जि प प्राथमिक शाळा लिंबी चिंचोळीचे मुख्याध्यापिका गोडके आणि सर्व शिक्षक, शिक्षिका उपस्थित होते. प्रतिमा पूजन नागनसुरे यांच्या हस्ते झाले त्यानंतर प्रशालेतील इयत्ता 10 वी च्या विद्यार्थिनींनी स्वागत गीत सादर करत मान्यवरांचे स्वागत केले. त्यानंतर प्रशालेचे मुख्याध्यापक अतनुरे सरांनी मान्यवरांचा स्वागत सत्कार "शाल -पुष्प गुच्छ "देऊन केले.
याप्रसंगी केली.प्रस्तावन भाषणात अतनुरे सरांनी मॅडमच्या कार्यबदल स्तुती व्यक्त केले. नागनसुरे साहेबांनी त्यांच्या या कार्याबद्दल कौतुक करत भावी कार्यास शुभेच्छा दिल्या.
यावेळी नदाफ यानी पोरे यांच्या सायकल वाटप कार्यक्रमाचे तोंड भरून कौतुक केले सूत्रसंचालन प्रशालेचे सहशिक्षक श बिराजदार एन टी यांनी केले तर कार्यक्रम
"*यशस्वी होण्यासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक अतनुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षकांनी कर्तव्य पार पाडले