पंढरपूर प्रतिनिधी
कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागात शिक्षण घेत असलेल्या द्वितीय वर्षांतील विद्यार्थ्यांसाठी बुधवार दि. २१ आणि २२ सप्टेंबर २०२२ रोजी "प्रिंटेड सर्किट बोर्डचे" वर्कशॉप घेण्यात आले हि माहिती प्राचार्य डॉ कैलाश करांडे यांनी दिली.
यासाठी प्रा. अविनाश हराळे यांनी खूप छान मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाची सुरवात मान्यवरांच्या हस्ते सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करून व दीपप्रज्वलनाने करण्यात आली.
इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वर्कशॉपचे विभाग प्रमुख डॉ. अल्ताफ मुलाणी यांनी प्रास्ताविक करताना म्हणाले, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी असे अनेक वेबिनार, वर्कशॉप इत्यादी कार्यक्रम आपण नेहमीच आयोजित करतो. त्यामुळे विद्यार्थ्यांचे टेकनिकल स्किल काढते . याचा फायदा विद्यार्थ्यांना प्लेसमेंटमध्ये होतो.
या वर्कशॉपसाठी एकूण ६३ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला त्यांनी प्रिंटेड सर्किट बोर्ड तयार केले. यासाठी त्यांनी हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर दोन्हींचा वापर केला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.