सोलापूर प्रतिनिधी
कामगार नेते विष्णु कारमपुरी (महाराज) यांची सोलापूर शहरप्रमुखपदी निवड जाहीर झाली आहे. सदर निवड शिवसेना पक्षप्रमुख मा. उध्दवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशानुसार शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत साहेब यांनी दैनिक सामन्यात जाहीर केले आहेत.
शिवसेना नेता व युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे व महाराष्ट्र राज्याचे समन्वयक विश्वनाथ नेरूरकर यांच्या मार्गदर्शनाने संपर्कप्रमुख अनिल कोकीळ , सोलापूर जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांच्या शिफारसीने विष्णु कारमपुरी (महाराज) यांची सोलापूर शहरप्रमुखपदी जाहीर करण्यात आली आहे.
विष्णु कारमपुरी (महाराज) हे सन १९९१ - १९९२ पासुन शिवसैनिक म्हणुन प्रा. अजय दासरी यांच्या नेतृत्वाखाली कामाला सुरूवात केले. त्यानंतर शिवसेना शहर कार्यालयप्रमुख, शिवसेना विभागप्रमुख, शिवसेना उपशहरप्रमुख, शिवसेना प्रसिध्दीप्रमुख, शिवसेना उपजिल्हाप्रमुख व तेलंगाणा राज्याचे सहसंपर्कप्रमुख अशा अनेक पदावर काम केले.
त्याचबरोबर सोलापूर शहर हे कामगारांचे शहर असल्याने कामगारांना शिवसेनेच्या माध्यमातून त्यांचा न्याय – हक्कासाठी तत्कालीन संपर्कप्रमुख विलास भानुशाली यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र कामगार सेनेची स्थापना करून कामगार सेनेचे अखंड काम सुरू आहे. त्याच कामगार सेनेच्या वतीने गोर – गरीब बेघर विडी कामगारांसाठी माँ साहेब मिनाताई ठाकरे यांच्या नावांने गृहनिर्मांण संस्था निर्मांण करून ५ हजार घरांची योजना यशस्वीरित्या राबविली. ज्याठिकाणी कामगारांमध्ये लाल बावट्याचे वर्चस्व होते .
त्याचठिकाणी कामगारांमध्ये शिवसेनेचे विचार घराघरात पोहोचविले. आणि शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयातून येणारे सर्व आंदोलनात सक्रीय सहभाग नोंदवितात एक सच्छा शिवसैनिक म्हणुन त्यांची ख्याती व ते मातोश्रीचे जवळीक असल्याचे मानले जाते.