मुंबई प्रतिनिधी - गणेश हिरवे
जोगेश्वरी पूर्व येथील गीतांजली रेल्वे कॉलनीतील वनदेवी मंदिराच्या परिसरात नुकतेच आज पितृपक्ष सर्वपित्री म्हणून अरविंद गंडभीर शाळा, जोगेश्वरी पूर्व येथील माजी विद्यार्थी संघाच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शाळेतील १९७० सालचे माजी विद्यार्थी डॉ.माधव देशपांडे हे उपस्थित होते.विशेष म्हणजे त्यांनी मालाड हून स्वतः काही झाडं लावण्यासाठी आणली होती.सध्या मुंबईत अमाप वृक्षतोड विविध कारणांमुळे होत असून सर्वत्र सिमेंट क्रोंक्रिट चे जंगल उभ राहत आहे.एखादा वृक्ष तोडला तर त्याची हानी होतेच पण त्यावर राहणाऱ्या प्राणी-पक्षी यांना देखील आपण बेघर करतो व ही खूप वेदनादायक गोष्ट आहे असे यावेळी सामाजिक कार्यकर्ते गणेश हिरवे यांनी सांगितले.
सकाळचे पत्रकार निसार अली यांनी आंब्याचे कोयी पासून बनविलेले सीड बॉल आणि माजी विद्यार्थी सुनील चव्हाण यांनी देखील काही झाडं लावण्यासाठी भेट दिली होती. वृक्षारोपणसाठी ग्रुप संचालक किरण वैद्य, सुनील सरदेसाई, डॉ. माधव देशपांडे, सुनील चव्हाण, प्रियांस हिरवे, आदी मान्यवर वेळातवेळ काढून उपस्थित होते.
वड, फणस, आंबा, खजूर, चाफा, सीताफळ, पारिजातक अशी साधारण पंचवीस फळ-फुल झाड लावण्यात आली. वनदेवी मंदिरात घटस्थापना होत असून अष्टमीच्या दिवशी होणाऱ्या महाप्रसादासाठी माजी विद्यार्थ्यांच्या वतीने दहा किलो रवा ताडकेश्र्वर महाराज यांना यानिमित्ताने देण्यात आला.