सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
भावसार व्हिजन इंडिया, सोलापूर सेंट्रलतर्फे इंडियन रेड क्रॉस सोसायटीच्या थॅलेसीमिया सेंटरला ₹१०,००० ची आर्थिक मदत देण्यात आली. थॅलेसीमिया रुग्णांना नियमित रक्त संक्रमणासाठी आवश्यक असलेल्या उपचारांमध्ये मदत व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
या आर्थिक मदतीमुळे थॅलेसीमियाने ग्रस्त असलेल्या पाच रुग्णांना त्यांच्या रक्त संक्रमणासाठी मदत होणार आहे.
या कार्यक्रमास भावसार व्हिजन इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष मनीष सुत्रावे तसेच गव्हर्नर श्रीराज निकते यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी अध्यक्ष सुशील महिंद्रकर सचिव इंजि. सागर पुकाळे खजिनदार प्रभाकर कुसुमकर अश्विन डोईजोडे, राजेश झिंगाडे, सिद्राम हंचाटे, लक्ष्मिकांत मुसळे, किरण मुसळे, रवि वायचळ, किरण पुकाळे, पुनम पुकाळे, दीपा उपरे, माधुरी लोकरे इत्यादी जण उपस्थित होते. हा कार्यक्रम साठी ऍड.किरण रणसुभे व अतुल रणसुभे यांचे विशेष असे सहकार्य लाभले.
भावसार व्हिजन इंडिया सोलापूर सेंट्रलच्या वतीने समाजातील गरजू घटकांना आरोग्यविषयक मदत करण्यासाठी विविध सामाजिक उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहेत.

