मुंबई प्रतिनिधी - गणेश हिरवे
देशातील दळणवळण व परिवहन क्षेत्रात "वाहन चालक" हा अत्यंत महत्त्वाचा घटक असून त्यांची अनन्य साधारण भुमिका आहे. वाहनचालक दिनाचे औचित्य साधून होकारार्थी भूमिकेतून इंटक कामगार संघटनेचे वतीने वाहनचालकांचा उचित सन्मान केला याचा आम्हास अभिमान वाटतो आहे असे गौरवोदगार सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे कुलसचिव डाॅ. प्रफुल्ल पवार सर यांनी काढले.
देशाच्या विकासामध्ये वाहनचालक हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. त्यांचा उचित सन्मान करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्याचे परिवहन आयुक्त मा. डाॅ. अविनाश ढाकणे, मुंबई यांनी दि. १७ सप्टेंबर हा *वाहन चालक दिन* म्हणून नुकताच घोषित केला आहे. याचे औचित्य साधून विद्यापीठ इंटक कामगार संघटनेतर्फे वाहन चालकांचा गुणगौरव समारंभ गुरूवार दि. २२ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ११.३० वाजता मा. कुलसचिव डाॅ. प्रफुल्ल पवार यांचे हस्ते संघटनेचे कार्यालयात मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
याप्रसंगी सा. फु. पुणे विद्यापीठ वाहनचालक प्रशांत जाॅन, आनंदा वाळके, सुरेंद्र वनवे, तिरूमणी सुब्रमण्यम, निलेश जाधव, फयाज शेख, यांचेसह १४ वाहनचालकाचा सन्मान मा. कुलसचिव प्रफुल्ल पवार व गृहव्यवस्थापक साळुंखे सर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व देवून करण्यात आला.
इंटक संघटनेचे अध्यक्ष रघुवीर व्हावळ यांनी वाहन चालकांच्या कामाचे कौतुक करून सन्मान सोहळा आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. वाहनचालक यांचे पाठीवर थाप देण्यासाठी आवश्यक असलेला हृदयस्पर्शी सन्मान सोहळ्याचे आयोजन केल्याबद्दल गृहव्यवस्थापक ज्ञानेश्वर साळुंखे यांनी "इंटक" संघटनेचे अध्यक्ष व पदाधिकारी यांचे आभार मानले. तर उपाध्यक्ष ज्ञानेश्वर चेरीयल यांनी कुलसचिव डाॅ. प्रफुल्ल पवार यांचे विशेष आभार मानले. विद्यापीठाच्या इतिहासात आमचा प्रथमच सामुदायिक सन्मान होत असून सेवा करीत असताना जर चूका झाल्या तर आम्हास माफ करा असे सत्काराला उत्तर देताना भावना व्यक्त केली. यावेळी इंटक संघटनेचे सरचिटणीस सुभाष मुळे, उपाध्यक्ष संजय नेवसे, सहसचिव महेश मंडलिक व विलास भालेराव, जयंत कुलकर्णी, राजू खामकर यांचेसह इतर पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन इंटक संघटनेचे पदाधिकारी जितू कोंडे, प्रशांत सुतार, किरण तडाखे, अंकुश देशमुख, विजय खोमणे, संतोष शिंदे, बाळासाहेब कांबळे यांनी केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन संघटनेचे सरचिटणीस सुभाष मुळे तर आभार प्रदर्शन कीशोर घडीयार यांनी केले.