पंढरपूर प्रतिनिधी
राष्ट्रनायक पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा अंतर्गत पंढरपूर ग्रामीण मधील आनंदी मंगल कार्यालय, जलोळी चौक, करकंब आणि कर्मयोगी सभागृह, खवा बाजार, पंढरपूर अश्या दोन्ही ठिकाणी सहकार सम्राट आ.प्रशांत (मालक) परिचारक यांच्या नेतृत्वाखाली आणि पंढरपूर मंगळवेढा तालुक्याचे युवक नेते .प्रणव (दादा) परिचारक यांच्या प्रमूख उपस्थितीत "भव्य पशुपालक मेळावा" आयोजीत करण्यात आला होता.
याप्रसंगी प्रखर राष्ट्रप्रेमी असणारे, अंत्योदयाचे प्रणेते श्रद्धेय "पंडित दीनदयाळ उपाध्याय" जयंती निमित्त त्यांच्या पावन स्मृतीस पुष्पहार अर्पण करून शतशः अभिवादन केले.
सध्या पशूंच्या बाबतीत सुरू असलेल्या "लम्पी" या आजाराच्या बद्दल डॉ.नितीन मार्कंडेय सर आणि डॉ. सतीश डिग्रसकर सर यांच्या मार्फत उपस्थितांच्या आणि पशुपालकांच्या प्रश्नांवर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी सेवा पंधरवडा चे संयोजक श्री.अक्षय वाडकर यांनी उपस्थित पशुपालकांचे आणि दूध उत्पदक शेतकरी, पदाधिकारी यांचे आभार प्रदर्शन केले.
यावेळी श्री.पांडुरंग शुगर चे व्हा.चेअरमन कैलास खुळे सर, मा.जि.प.सदस्य बाळासो देशमुख, ज्येष्ठ नेते ज्ञानूभाऊ ढोबळे, ज्येष्ठ नेते दाजी भुसणर, संजय व्हरगर, पं.स.सदस्य राहुल पुरवत, किसान मोर्चाचे माऊली हळणवर, डॉ मोरे सर, डॉ भिंगारे सर, विजय जाधव, राणू पाटील भाजपा जि.उपाध्क्ष संदिप माने, शहर सरचिटणीस प्रशांत सापणेकर, तालुका उपाध्यक्ष संदिप कळसूले, शहर संघटक धीरज म्हमने, शहर कार्यालय प्रमूख गणेश शिंघण, हर्षल कदम, विकास पाटील व करकंब परिसरातील आणि पंचक्रोशीतील पंढरपूर शहरातील पदाधिकारी, तरुण सहकारी, पशुपालक आणि इतर मान्यवर उपस्थित होते.