पंढरपूर प्रतिनिधी
अनेकांना अशक्यप्राय वाटणारा 'शब्द' पाळला.. मागील हंगामाचे सुमारे ३० कोटींचे उसाचे बील शेतकरी सभासद बांधवांना आम्ही वितरित करत आहोत !
श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यातील या आधीच्या "अनुभवी" संचालक मंडळाच्या कारभारामुळे ही रक्कम थकीत होती, "नवखे" चेअरमन काय देणार असा अविश्वास वर्तविला जात होता.. कारखाना सुरू असताना मागील बिल देऊ शकले नव्हते तर कारखाना बंद असताना बिल कसे देणार ? असे प्रश्न उपस्थित केले जात होते.. निवडणुकीत दिलेले आश्वासन खोटे आहे असे विरोधक म्हणत होते..
विरोधकांनी सर्व प्रकारे अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला.. पण विठ्ठलाच्या कृपेने आणि हजारो शेतकऱ्यांच्या आशीर्वादाने सर्व संकटांवर मात करून आपण दिलेला शब्द पाळला आहे..
सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की, त्यांनी त्वरित डीव्हीपी पिपल्स मल्टीस्टेट या बँकेत खाते उघडून घ्यावे. मागील हंगामाची रक्कम तात्काळ आपल्या खात्यात वर्ग करण्यात येईल.