भाळवणी प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील वार्ड क्रमांक चार मधील अण्णाभाऊ साठे चौक ते एसटी स्टँड या रस्त्याच्या कॉंक्रिटीकरणाचे काम सध्या सुरू असून या रस्त्याच्या दुसऱ्या स्तराचे कामाचे उद्घाटन सरपंच राजकुमार पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य पोपट इंगोले विष्णुपंत लिंगे सचिन कुचेकर प्रभाकर गवळी प्रमोद माने नितीन शिंदे, प्रवीण शिंदे आनंद देशपांडे बाळासाहेब गवळी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी ठेकेदार बागल म्हणाले, हा रस्ता करताना गावातील ग्रामस्थांनी सहकार्य करणे अपेक्षित आहे रस्त्यावरून चालत जाणे, मोटरसायकल चालवणे, इतर वाहतूक करणे, त्याचबरोबर रस्त्यावरील सिमेंट काँक्रीट काढून नेणे अशा बाबी न करता हा रस्ता आपलाच आहे असे समजून सहकार्य करावे असे आवाहन ग्रामस्थांना केले आहे.