मुंबई - गणेश हिरवे
शनिवार दिनांक २४ सप्टेंबर रोजी बी जे पी नेता व टीडीएफ चे सल्लागार प्रमुख मार्गदर्शक माजी उपमहापौर मुंबई आणि गरीबांना कमी किंमतीत घरे देणाऱ्या आरजू निवारा या हौसिंग सोसायटी मुंबई चे ट्रस्टी बाबूभाई भवानजी यांनी प्रभादेवी दादर मुंबई येथे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांना शिक्षकांवर होणारा अन्याय व त्यांचे प्रलंबित प्रश्न व मागण्यांचे निवेदन दिले.
यावेळी खासदार राहुल शेवाळे, स्थानिक आमदार सदा सरवणकर, आमदार कालिदास कोळंबकर, नगरसेवक समाधान सरवणकर तसेच टी डी एफ चे अध्यक्ष, शिक्षक नेते जनार्दन जंगले, मधुबाला जंगले, शांतिभाई मारू उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांनी टीडीएफ ने उपस्थित केलेले शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी बैठक आयोजित करून न्याय मिळवून दिला जाईल असे स्पष्ट केले.तसेच टीडीएफ तर्फे आयोजित करण्यात आलेल्या १६ ऑक्टोबर रोजीच्या संघटनेच्या सक्रिय कार्यकर्त्यांचा व त्यांच्या गुणवंत पाल्यांना सत्कार आणि कौटुंबिक समारंभास उपस्थित रहाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.