मुंबई प्रतिनिधी - गणेश हिरवे
रत्नागिरी जिल्हा मराठा ज्ञाति समाज, मुंबई संस्थेच्या हीरक महोत्सवाचे औचित्य साधून संस्थेच्या चिटणीस सुरक्षा घोसाळकर यांच्या प्रमुख उपस्थिती होती.
बालविकास विद्या मंदिर शाळेचे मुख्याध्यापक श्री .सिध्दार्थ इंगळे व आरजेएमडीएस इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका डिंपल दुसाणे यांच्या मार्गदर्शनाने के/पी पूर्व विभागातील इयत्ता ८वी ते ९ वी च्या विद्यार्थ्यां करीता भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, शाळेचा एक त्रिवेणी संगम (संस्था-बालक-पालक शाळा), मानव पर्यावरण रक्षक की भक्षक या विषयावर आंतरशालेय चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
३६ शाळातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेल्या स्पर्धेच्या व्यवस्थापनाची जबाबदारी कलाशिक्षिका अनघा घुगरे, सौं. निकिता भागवत, विशाखा नाईक, तसेच शिक्षक विलास रहाटे यांनी यशस्वीपणे पार पाडली.