पंढरपूर प्रतिनिधी
बाळासाहेब काळे प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था मर्यादित,पंढरपूर यांच्यामार्फत दिला जाणारा आदर्श शाळा पुरस्कार केसकरवाडी जिल्हा प्राथमिक शाळेस
नुकताच प्रदान करण्यात आला.सत्कार स्वीकारताना शाळेच्या मुख्याध्यापिका गुजरे मॅडम,वाघमारे गुरुजी,लंगोटे गुरूजी मस्के गुरुजी उपस्थित होते.
यावेळी सत्कार प्रदान करताना विस्तार अधिकारी रणदिवे साहेब, राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेचे माजी अध्यक्ष मा.बाळासाहेब काळे गुरुजी,शांताराम गाजरे गुरूजी, दत्तात्रय रोंगे गुरुजी,रामभाऊ यादव गुरुजी व सर्व शिक्षक वर्ग उपस्थित होते.
प्राथमिक शाळेत विविध प्रकारची वनस्पती,शिक्षकाच्या ज्ञानामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाढलेली बोद्धीक,शारीरिक क्षमता,तसेच शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये वाढवलेली सामाजिक मूल्ये त्यामुळेच पुरस्कार आपल्या प्राथमिक शाळेला मिळाला.
अशीच प्रगती उत्तरोत्तर होवो हीच सदिच्छा व्यक्त केली जात आहे. हा पुरस्कार मिळाल्या बद्दल सरपंच केसकर, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उत्तम मासाळ सदस्य व ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.