सोलापूर प्रतिनिधी
श्री.बृहन्मठ होटगी शैक्षणिक संस्थेतील श्रीक्षेत्र धोत्री येथील श्री.भगवती गौरीमाता प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा. स्वामीनाथ कलशेट्टी यांची महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय इतिहास परिषदेच्या राज्य कार्यकारणी सदस्य पदी निवड करण्यात आली.
अध्यक्ष मा. प्रा.रंगनाथ कांगणे,कार्याध्यक्ष मा.श्री सुनील शिंदे,उपाध्यक्षा प्रा. स्मिता जयकर, सचिव.डॉ.प्रा नितीन देवतळे,कोषाध्यक्ष मा.प्रा रंजय चौधरी या पदाधिकार्यांकडून प्राध्यापक कलशेट्टी यांना निवडीचे पत्र देण्यात आले. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष प्रा. संजय जाधव,प्रा नरेश पवार,प्रा.श्रीधर सगेल,प्रा.प्रशांत नागुरे,प्रा.सतीश नागणे,प्रा.मीनाक्षी मेडपल्ली आदी मान्यवर उपस्थित होते.
सरांच्या निवडीबद्दल श्री.श्री.श्री 1008 ज्ञानसिंहासनाधीश्वर डॉ.मल्लिकार्जुन विश्वाराद्य शिवाचार्य महास्वामीजी काशी महापीठ व बृहन्मठ होटगी संस्थेचे नूतन उत्तराधिकारी परमपूज्य श्री.ष.ब्र चन्नयोगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजीनीं शुभाशीर्वाद दिले.
यावेळी संस्थेचे सर्व पदाधिकारी,प्राचार्य, मुख्याध्यापक, मुख्याध्यापिका, उपमुख्याध्यापक. पर्यवेक्षक, प्राध्यापक,शिक्षक शिक्षिका,शिक्षकेत्तर कर्मचारी व ग्रामस्थ आदिनीं मन:पूर्वक हार्दिक शुभेच्छा देऊन कौतुक करून अशीच यशस्वी वाटचाल यापुढील काळात होत राहो अशी श्रीगुरु चरणी प्रार्थना करून,श्री कलशेट्टी सरांना मनःपूर्वक शुभेच्छा दिले.